सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. वरील संकल्प आपण सगळ्यांच्या सहकार्याने आणि शुभ चिंतनाने पूर्णत्वास गेला. आपले असेच सहकार्य संस्थेच्या कार्यासाठी सदैव लाभो ही नम्र विनंती. वरील वास्तूतून – -१ पर्यावरण रक्षण व वृक्षसंवर्धन जागृती केंद्र २ मोफत आरोग्य तपासणी
केंद्र ३ गरीब व गरजूंना पीडितांना मदत केंद्र ४ विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन व संस्कार केंद्र ५ महिला सबलीकरण सल्ला केंद्र ६ अंधश्रद्धा निर्मूलन केंद्र ७ तरूणांसाठी उद्योजकता विकास केंद्र ८ व्यसनमुक्ती समुपदेशन ९ छत्रपती शिवराय, डॉ आंबेडकर, स्वा.सावरकर विचारधारा प्रसार केंद्र १० भारतीय संस्कृती प्रसार केंद्र इत्यादी विविध क्षेत्रात कार्य करण्याचा संस्थेचा मानस आहे. आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे कार्य पोहोचवुन कार्याची व्याप्ती वाढवावी . ही नम्र विनंती .ब्रह्मांड संस्थान सामाजिक राष्ट्र सेवा पुणे ,दोन झाडे लावा वाढवा, स्वतःचा ऑक्सिजन स्वतः मिळवा. पुन्हा एकदा सर्व दात्यांचे आणि शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार.