आज बुधवार दि 27 जाने रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रह्मान्ड संस्थान ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला 80 दात्यांनी भेट दिली आणि 56 जणांनी नोंद केली त्यापैकी 39 जणांना रक्तदान करण्याची संधी मिळाली,अनेक जण हिमोग्लोबिन कमी असल्याने रक्तदान करू शकले नाहीत.या कार्यक्रमाचे सुरवात CGM ITPC आणि श्री देशमुख महाराज,विचारवंत यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन,दीप प्रज्वलन,नारळ वाढवून झाली.मान्यवरांचा सत्कार श्री किणीकर आणि किशोर रामाणे यांचे हस्ते होऊन BSNL मधील संघटनांचे पदाधिकारी श्री वीरेंद्र चौधरी,विजय शिंदे याना फुले देऊन स्वागत करण्यात आले.अर्पण रक्तपेढी चे भाग्यश्री याना श्रीमती मनीषा पोतदार यांनी गौरविले.या कार्यक्रमात BSNL सर्व ऑफिसर,कर्मचारी यांनी सहभाग दिला.स्वयंसेवक चा भार श्री वसुले,श्रीमती ज्योती झा,श्री राहुल
गावडे,रोशन भगत,श्री प्रदीप किणीकर,श्री विद्याधर पाटील ,मनीषा पोतदार,महेश शिर्के यांनी सांभाळला.मंगेश कुलकर्णी यांचे सहकार्य ,सर्व BSNL कर्मचारी वर्गामुळे कार्यक्रम छान पध्दतीने पार पडला.ब्रम्हांड संस्थान तर्फे सर्व जणांचे आणि अनेक अदृश्य मदतनीस, चे मनापासून धन्यवाद.जय हिंद.