दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी ब्रह्माण्ड संस्थान चा ९ व वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वृक्षप्रेमी श्री रघुनाथ ढोले,समाज सुधारक श्री देशमुख महाराज आणि श्री शरद जगताप उपस्थित होते ,सौ अनिता एडके यांच्या सुमधुर गायनाचा कार्यक्रम श्री गणेश वंदनाने सुरु झाला.सुरेख अभंग आणि भक्तिगीते रसिकांना भावली आणि असे भक्तिमय वातावरण निर्माण झाल्यावर तुळशीला जल अर्पण करून,दीप प्रज्वलनाने ,भारत मातेस पुष्प अर्पण करून मुख्य कार्यक्रम सुरु झाला. पूर्वी श्री दिलीप हल्याळ यांनी आपल्या एकपात्री नाट्यप्रयोगातून हास्याचे तुषार उडविले आणि सर्वांना मनसोक्त हसविले .अशा आनंदमय वातावरणात सर्व मान्यवरांचे सत्कार पार पडले.नंतर श्री प्रवीणकुमार मदेशी याना वृक्षमित्र ,प्रयास संस्थेतर्फे तृप्ती धारपोवार याना कॅन्सर प्रतिबंधात्मक कार्य,श्रीमती वर्षा सारडा याना संस्कृत भाषा प्रसार ,आणि श्री ऋषिकेश दसवडकर याना गोरक्षण कार्यासाठी सामाजिक राष्ट्रसेवा पुरस्कार २०२२ साठी देण्यात आले.
नंतर सर्व माननीयांनी आपले विचार उपस्थित श्रोत्यासमोर मांडले ,सर्वांनी राष्ट्रसेवेत आपला सहभाग सांगून विशेषतः श्री रघुनाथ ढोले यांनी आपल्या मागील चार पिढयांना देवराई म्हणजे देवाचे जंगल तयार करून मुक्ती कशी देता येईल हे सांगितले.ते स्वतः सन २०१२ पासून दर वर्षी एक लाख रोपे तयार करून सर्वांस मोफत देतात.श्री देशमुख महाराज यांनी संस्कृती टिकवण्यासाठी समाज पुढे सेवेतून आदर्श कसा निर्माण करता येईल हे विचार मांडले.तसेच श्री शरद जगताप यांनी संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
यानंतर कॅन्सर तपासणी शिबीर करीत सहकार्य केलेल्या कर्मवीरांच्या सत्कार झाला.आणि आलेल्या ५ विविध संस्था संकल्प वसतिगृह राशीन, सार्थक सनाथश्रम आंबले,(दोन्ही संस्था पारधी वस्तीतील अनाथ मुलांना सांभाळतात),दत्तात्रय फौंडेशन मार्फत आनंदग्राम गुरुकुल नारायणपूर,स्वामीनिवास वृद्धाश्रम,पौड आणि माउली वारकरी शिक्षण संस्था ,नसरापूर या सर्व संस्थाना एक महिना पुरेल इतके धान्य आणि शैक्षणिक साहित्य रूपाने मदत देण्यात आली,सर्व उपस्थितांचे आभार मानून पसायदानाने कार्यक्रम समाप्त झाला आणि स्नेहभोजनाने संपन्न झाला,
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्री दिलीप हल्याळ,सौ अनिता एडके , श्रीमती वेदिका कुलकर्णी,श्रीमती मंजिरी मधीह्ल्ली ,श्रीमती वृषाली इनामदार ,श्री किशोर रामाने,मनीषा पोतदार,प्रसाद राऊळ,शिल्पा जोशी,अंशी गोयल,मधू राठी,शशांक हापसे,प्रिया राऊळ ,तृप्ती गिरीश इंगळे,संजय पवार,लक्षमिकांत शर्मा,देसाई मॅडम,नीता उपाध्ये,रम्या मॅडम,दयासागर,भास्कर राणे,भास्कर सफर,मॅडम नीलिमा कुलकर्णी,श्री अजय गुडे,श्री राजेश पाटील,राजश्री परब, आशा दळवी,गणपत दळवी,केयूर,श्री जाधव,कोमल,श्री मंगेश कुलकर्णी, श्रीमती सौंदरं ,श्रीपाद बोरगावकर,सौ अर्चना महाबळेश्वरकर,लॅव्हेंटोना मेंडोका सर्व दाते आणि स्वयंसेवक यांचे असल्याने सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.संस्थेस सेवा करण्याची संधी देऊन सत्पात्री राष्ट्रकार्यात सहभागी झाल्याचा आपण सर्वांचा आम्हास अभिमान आहे.असेच स्नेह आणि आशीर्वादाची अपेक्षा , सर्व कार्य सेवा भारत मातेस अर्पण,जय हिंद.