
दि 17 ऑगस्ट 21 रोजी ब्रह्माण्ड संस्थान चा आठवा वर्धापन दिन उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमाला वनस्पती तज्ञ डॉक्टर विनया घाटे, लायन्स क्लबचे प्रमुख श्री राजेश बंसल, हास्य सम्राट श्री दिलीप हल्ल्याळ, सर्व पुरस्कार विजेते, मानव्य ,सरस्वती, निहार व स्पर्श या अनाथ आश्रमातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सौ अनिता एडके यांच्या संगीत कार्यक्रम ने मन प्रसन्न केले. तसेच श्री दिलीप हल्ल्याळ यांच्या कार्यक्रमाने रंगत आणली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे देणगीदार व आश्रयदाते यांच्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. संस्थेला मदत करणारा सर्व दात्यांचा मनःपूर्वक धन्यवाद .आपल्या सगळ्यांचा शुभाशीर्वाद या कार्यासाठी सतत लाभो , अशी आपल्या चरणी नम्र विनंती .धन्यवाद ब्रह्मांड संस्थान सामाजिक राष्ट्र सेवा पुणे.